अकोला : बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये कार्यरत असलेल्या श्वान टायगरचा गणेशोत्सव समारोपीय मिरवणुकीच्या दिवशी अचानक मृत्यू झाला. टायगरवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्याचा अचानक मृत्यू झाल्याचे बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये कार्यरत असलेल्या श्वान टायगरने त्याच्या कार्यकाळात चार महत्त्वाच्या थ्रेड कॉलमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. यासोबतच नागपूर येथील अधिवेशनामध्ये टायगर दरवर्षी कर्तव्य बजावत होता. व्हीआयपी बंदोबस्त, निवडणूक, दरोडा, चोरी, हत्या अशा महत्त्वाच्या घटनांसाठी टायगरला पाचारण करण्यात येत होते. रविवारी गणेशोत्सवामध्ये कर्तव्यावर कार्यरत असताना श्वान टायगरचा अचानक मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणी केली असता, किडनीमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. टायगरवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
बॉम्ब शोधक-नाशक पथकातील श्वान ‘टायगर’चा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 6:46 PM