अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गवळीपुरा येथे दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीतील गंभीर जखमी असलेल्या जावेद बुद्धू गौरवे यांचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या हाणामारीत तब्बल १७ जण जखमी झाले असून, यामधील एकाचा मृत्यू झाला, तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. या प्रकरणातील १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.गवळीपुरा येथील रहिवासी तसेच दूरचे नातेवाईक असलेल्या दोन गटात चार दिवसांपूर्वी तुफान हाणामारी झाली होती. या हाणामारीत दोन्ही गटातील तब्बल २० जणांनी एकमेकांवर धारदार शस्त्र, काठ्या, लोखंडी रॉड तसेच दगडफेक करून मारहाण केली होती. त्यामुळे या हाणामारीत १७ जण जखमी झाले होते. त्यामधील दोन जण गंभीर जखमी झाले होते, तर यामधील एकाचा शुक्रवारी दुपारी मृत्यू झाला असून, एक जण अद्यापही गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणात शमीम मोहम्मद गौरवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समीर यासीन चौधरी, साजिद इलियास चौधरी, फरदीन इलियास गौरवे, नाजिम कासम गौरवे, सोहेल यासीन चौधरी, साहिल यासीन चौधरी, फिरोज लल्लू गौरवे, आफताब इलियास गौरवे, इलियास लल्लू गौरवे, जहूर लल्लू गौरवे आणि शमीम बानो इलियास गौरवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला; मात्र त्यानंतर जावेद बुद्धू गौरवे यांचा मृत्यू झाल्याने सदर आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तर दुसºया गटातील शमीम बानो इलियास गौरवे यांच्या तक्रारीवरून सलीम बुद्धू गौरवे, मोहम्मद बुद्धू गौरवे, जावेद बुद्धू गौरवे, जब्बार बुद्धू गौरवे, बिलाल मोहम्मद गौरवे, आदिल मोहम्मद गौरवे, राजिक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, मोहसिन आणि सोहेल यांच्याविरोधात भादंवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील राजिक मोहम्मद नौरंगाबादी, रफीक मोहम्मद नौरंगाबादी, शेख बाबर शेख भुरा गौरवे तसेच नाजिम कासम गौरवे, साजिद इलियास गौरवे, साहिल यासीन गौरवे, फरदीन इलियास गौरवे, समीर यासीन चौधरी, सोहेल यासीन चौधरी आणि शमीम इलियास गौरवे, सोहेल दर्गीवाले आणि मोहसिन नौरंगाबादी या १२ आरोपींना अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आणखी आरोपींची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे.
हाणामारीतील जखमी व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 10:22 AM