तामशी/वाडेगाव : येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या सहा किलोमीटर अंतरावर चिंचोली गणू येथील ३७ वर्षीय मजुराचा तुलंगा शेतशिवारातील अवैध रेतीचे उत्खनन करताना रेतीच्या ढिगाºयाखाली दबून मृत्यू झाल्याची घटना २२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.चिंचोली (गणू) येथील मजूर विलास डिगांबर वाघ (३५) हा रेतीचे उत्खनन करण्यासाठी गेला होता. जेसीबीने खोदकाम केलेल्या भागात काम करीत असताना वरील रेतीचा ढिगारा अचानक खाली कोसळला. त्यामध्ये मजूर विलास वाघ दबला. त्याच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. त्याला कसेबसे ढिगाºयातून बाहेर काढून वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. या ठिकाणी उपचार करीत असताना विलास वाघ याचा मृत्यू झाल्ल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी घुगे यांनी दिली आहे. विलास वाघ याच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी भाऊ असा आप्त परिवार आहे. पसिरात अवैध उत्खनन वाढले आहेत. उत्खननामुळे विलास याला जीव गमवावा लागला. परिसरातील अवैध उत्खननाकडे महसूल अधिकाºयांचे दुर्लक्ष होत आहे.