७२ जणांना डिस्चार्ज
मंगळवारी जिल्ह्यातील ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच, आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक, ओझोन हॉस्पिटल येथून पाच, बिहाडे हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशन मधील ५४, अशा ७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
त्या रुग्णाच्या संपर्कातील आठ जण पाॅझिटिव्ह
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या नागपूरच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण सोमवारी पॉझिटिव्ह आले होते. मंगळवारी त्यात आणखी तीन रुग्णांची भर पडली असून, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आठवर पोहोचली आहे. तसेच दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. नागपूर येथील त्या रुग्णांना नवा स्ट्रेन असलेल्या कोरोनाची लागण असल्या, त्याचा शिरकाव अकोल्यातदेखील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोलेकरांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.