लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा / हिवरखेड : तालुक्यातील चांगलवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकर्याला १५ ऑगस्टच्या दुपारी शेतातील विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.पावसाने दडी मारल्यामुळे बागायतदार शेतकर्यांनी आपली पिके वाचविण्यासाठी शेतामध्ये मोटार पंप चालू केले होते. १५ ऑगस्टला दुपारी ३ वाजता चांगलवाडी परिसरात पाऊस आल्याने सुरू असलेले मोटार पंप बंद करण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी अवचित श्रीराम कडू (६0) शेतात गेले. तेथे विद्युत पुरवठा बंद करताना त्यांना विजेचा जबर धक्का लागून मृत्यू झाला. याबाबत घरातील लोकांना कसलीही कल्पना नव्हती. ते मंगळवारी रात्री व दुसर्या दिवशीही घरी आले नाही म्हणून शोधाशोध केली असता, आपल्या शेतालगत असलेल्या मारोती संस्थानच्या शेतात विद्युत मीटरच्या पेटीजवळ ते मृतावस्थेत आढळून आल्याची फिर्याद चांगलवाडी येथील गजानन कडू यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यावरून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास देवरे , हेड कॉन्स्टेबल राजू इंगळे हे करीत आहेत. मृताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे.
अल्पभूधारक शेतकर्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:45 AM
तेल्हारा / हिवरखेड : तालुक्यातील चांगलवाडी येथील एका अल्पभूधारक शेतकर्याला १५ ऑगस्टच्या दुपारी शेतातील विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी उघडकीस आली.
ठळक मुद्देचांगलवाडी येथील घटना विद्युत मोटार पंप बंद करताना शॉक लागल्याने मृत्यू