क्लिष्ट अटी, कागदपत्रांची अडचण या कारणांमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित रहावे लागते. मागील वर्षी महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ झाला. त्यामुळे रब्बी हंगामात कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. बँकांच्या अटींची पूर्तताही शेतकऱ्यांना करता आली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात गहू, हरभरा, कांदा, ज्वारी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. या पिकाची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे बहुतांश शेतकरी पीककर्जाचा आधार घेऊन हंगामाचे नियोजन करतात. मागील खरीप हंगामात जिल्ह्यात ७४ टक्के कर्जवाटप झाले होते. यावेळी सुमारे १ लाख ६ हजार ४३४ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्यात आले, तर रब्बी हंगामात ६ हजार ५०० शेतकऱ्यांना ६० कोटी रुपये वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यातील ६ हजार ४०३ शेतकऱ्यांना ६३ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये कर्जवाटप झाले. त्यामुळे यावर्षी रब्बी हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ घेता आला आहे.
--बॉक्स--
बँकांकडून झालेले कर्जवाटप
सार्वजनिक क्षेत्रातील बँक
३८ कोटी ७३ लाख ९५ हजार रुपये
खासगी क्षेत्रातील बँक
१६ कोटी ६२ लाख ५२ हजार रुपये
विदर्भ कोकण ग्रामीण बँक
७ कोटी १२ लाख ४२ हजार रुपये
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
९९ लाख ८८ हजार रुपये