शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

गटार योजनेच्या निविदेवर होणार निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:05 AM

शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या  भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेने निविदा प्रकाशित  केली असता दोन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. इगल  इन्फ्रा लिमिटेड ठाणे या कंपनीने ८.९ टक्के जादा दराने तसेच  विश्‍वराज इन्फ्रा कंपनी नागपूर कंपनीने तब्बल ७२ टक्के  जादा दराने निविदा सादर केली होती. प्रशासनाने इगल इन्फ्रा  लिमिटेड ठाणे कंपनीची निविदा मंजूर करीत अंतिम  मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केली. उद्या स्थायी समि तीच्या सभेत प्राप्त निविदेवर निर्णय होणार असून, याकडे  सर्वांंंचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देआज मनपाची स्थायी समिती सभानिर्णयाकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करणार्‍या  भूमिगत गटार योजनेसाठी महापालिकेने निविदा प्रकाशित  केली असता दोन कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. इगल  इन्फ्रा लिमिटेड ठाणे या कंपनीने ८.९ टक्के जादा दराने तसेच  विश्‍वराज इन्फ्रा कंपनी नागपूर कंपनीने तब्बल ७२ टक्के  जादा दराने निविदा सादर केली होती. प्रशासनाने इगल इन्फ्रा  लिमिटेड ठाणे कंपनीची निविदा मंजूर करीत अंतिम  मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर केली. उद्या स्थायी समि तीच्या सभेत प्राप्त निविदेवर निर्णय होणार असून, याकडे  सर्वांंंचे लक्ष लागले आहे.  सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी भूमिगत गटार योजना  राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत  पाणीपुरवठा वितरण प्रणालीची कामे निकाली काढल्यानंतर  दुसर्‍या टप्प्यात भूमिगत गटार योजनेचा समावेश आहे.  शासनाने भूमिगत गटार योजनेंतर्गत ३0 आणि सात एमएलडी  असे दोन प्लान्ट उभारण्यासाठी ७३ कोटी रुपये मंजूर केले  आहेत. यापैकी मनपाने ६१ कोटी रुपये किमतीच्या कामाची निविदा  प्रकाशित केली. निविदेला दोन वेळा प्रतिसाद न  मिळाल्यामुळे ११ जुलै रोजी तिसर्‍यांदा फेरनिविदा काढली. यामध्ये इगल इन्फ्रा लिमिटेड कंपनी ठाणे यांच्यावतीने ८.९  टक्के जादा दराची निविदा तसेच विश्‍वराज इन्फ्रा कंपनी नाग पूरच्यावतीने ७२ टक्के जादा दराची निविदा प्राप्त झाली होती.  यापैकी इगल इन्फ्रा लिमिटेडच्या निविदेला अंतिम  मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर करण्यात आले आहे. 

भाजपात धुसफूस; निर्णयाकडे लक्षभूमिगतसाठी निविदा सादर करणार्‍या इगल इन्फ्रा लिमिटेड  कंपनीत एक-दोन नव्हे, तर चक्क चार कंत्राटदार असून,  सर्वजण भाजपाशी संबंधित आहेत. यातील काही  कंत्राटदारांचे भाजपाच्या नागपूर येथील बड्या नेत्यांसोबत  संबंध आहेत. त्यामुळे या निविदेला मंजुरी मिळावी, यासाठी  भाजपाच्या स्थानिक नेत्यांवरही अप्रत्यक्ष दबावतंत्राचा वापर  केला जात असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे भाजपात  चांगलीच धुसफू स सुरू असून, एका ज्येष्ठ नेत्यांची नाराजी  असल्याचे बोलल्या जाते. भविष्यात योजनेच्या कामाला  सुरुवात झाल्यास पक्षातील अंतर्गत वादामुळे ती कितपत पूर्ण  होईल, यावर प्रश्नचिन्हे उपस्थित होत आहेत.

अन् कंपनीने दर कमी केले!भूमिगतचे काम कोणत्याही परिस्थितीत हातून निसटणार  नाही, याची पुरेपूर काळजी कंपनीने घेतल्याचे बोलल्या जाते.  कंपनीने ८.९ टक्के जादा दराने निविदा सादर केली होती. अचानक साक्षात्कार होऊन कंपनीने दर कमी करीत ५.६0  टक्के दराने निविदा सादर केल्याची माहिती आहे. यामध्ये  जीएसटीचासुद्धा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय.