'नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे'; काँग्रेसच्या ऑफरला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 21:31 IST2024-04-07T21:26:51+5:302024-04-07T21:31:39+5:30
पहिल्या टप्प्यातील निवडणूक रंगात आली असून, पूर्व विदर्भात वंचित’ला पाेषक वातावरण आहे. रामटेकमध्ये शिंदेसेना व किशाेर गजभिये यांच्यात खरी लढत असल्याचे ते म्हणाले.

'नाना पटोलेंचा प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे'; काँग्रेसच्या ऑफरला प्रकाश आंबेडकरांचे प्रत्युत्तर
राजरत्न सिरसाट
अकाेला : लाेकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पाेहाेचली असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले ‘वंचित’ला साेबत घेण्याचे वक्तव्य करीत आहेत खरं तर याला वरातीमागून घाेडे असेच म्हणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे केली. राज्यातील उर्वरित जागांचा निर्णय दाेन दिवसात जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यशवंत भवन निवासस्थानी आयाेजित पत्रकार परिषदेत ॲड. आंबेडकर यांनी महाविकास आघाडीवर बाेलताना उद्धवसेना व काँग्रेसमधील जागांचा वाद आता रस्त्यापर्यंत आला असल्याचे सांगितले. यासंदर्भात आपण अगाेदरच काँग्रेसला अवगत केले हाेते. पंरतु, राज्यात काँग्रेसला नेताच नसल्याची टीका करताना काँग्रेसला निर्णय घेता आला नसल्याचा आराेपही त्यांनी केला.
यामुळे काँग्रेसचे जिल्हास्तरावरील नेते स्वत:ला असुरक्षित मानत असून, भविष्यातील विधानसभा डाेळ्यासमाेर ठेवून आता ते भाजपचा पराभव कसा करता येईल या दृष्टीने स्थानिक पातळीवर निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, पहिल्या टप्प्यातील निवडणूक रंगात आली असून, पूर्व विदर्भात वंचित’ला पाेषक वातावरण आहे. रामटेकमध्ये शिंदेसेना व किशाेर गजभिये यांच्यात खरी लढत असल्याचे ते म्हणाले.
निवडणुकीच्या मतमाेजणीच्या अगाेदर ईव्हीममधील मतांसाेबतच पेपर ट्रेल मतांच्या माेजणीसाठीचा निर्णय सर्वाेच्च न्यायालय देण्याची शक्यताही त्यांनी यावेळी वर्तविली. पत्रकार परिषदेला सुजात आंबेडकरही उपस्थित हाेते.