याबाबतचा ठराव नगर परिषदेमधील सत्ताधारी राष्ट्रीय काँग्रेस व विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत एकूण ११ सदस्यांनी बहुमताने १६ फेब्रुवारीला मंजूर करून कायम केला. त्यामुळे हा ठराव गैरकायदेशीर असून, मराठी राजभाषेच्या शासन निर्णयाविरुद्ध असल्यामुळे तो रद्द करावा, पातूर शहरांमध्ये सर्व जाती-धर्माचे लोक असल्यामुळे मराठीसाेबतच उर्दू भाषेमध्ये फलक लावल्यास शहरातील इतरही भाषिक त्यांच्या भाषेमध्ये नाव लिहिण्याची मागणी करतील. त्यामुळे पातूर शहरामध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे प्रकरण नगरसेविका वर्षा बगाडे यांनी महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक वसाहती अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार प्रकरण दाखल केले होते. पातूर नगर परिषद कार्यालयाचे नाव मराठी भाषेसाेबतच उर्दू भाषेतसुद्धा लावावे, या बाजूने नगराध्यक्ष प्रभा कोथळकर, सय्यद बुरहान सय्यद नबी, सय्यद मुजाहिद इकबाल सय्यद मोहसीन, मोहम्मद एजाज मोहम्मद तालेब, सय्यद एहसानोद्दीन सय्यद ग्यासोद्दीन, हिदायतखान रूमखान, मोहम्मद फैज मोहम्मद मकसूद, हमीदाबी हुसेन शहा, तमीजाबी मोहम्मद शफी, रेहाना परवीन शेख अश्पाक, हकीमाबी सय्यद शेर अली, रूपाली सुरवाडे यांनी या ठरावाला बहुमताने पारित केले होते. मराठी भाषेबरोबर उर्दू भाषेमध्ये नाव देण्याचा ठराव रद्दबातल करण्याचा वर्षा बगाडे नगरसेविका पातूर यांचा अर्ज मंजूर केला आहे. बगाडे यांची बाजू ॲड. गजानन भोपळे यांनी मांडली.
------------काेट-----
उर्दू किंवा इतर सर्व भाषेविषयी मनात आदर आहे; मात्र पातूर शहरात विविध जाती-धर्माचे विविध भाषिक नागरिक राहतात. त्यामुळे इमारतीवर मराठीसाेबतच उर्दू भाषेत नाव टाकण्याचा ठराव पारित केल्यामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता हाेती. त्यामुळे हा ठराव रद्दबातल करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती.
वर्षा संजय बागडे, नगरसेविका, पातूर
--------------
शासन निर्णय काय म्हणताे?
महाराष्ट्र राज्य हे मराठी भाषिक राज्य आहे. शासन व्यवहारात राज्यभाषा मराठीचा वापर होणे आवश्यक आहे. शासन निर्णय १९८३ व शासन परिपत्रके ७ मे २०१८ व ३१ जानेवारी २०२० अन्वये काढण्यात आले आहे. शासन परिपत्रक ७ मे २०१८ मधील सर्वसाधारण सूचना क्रमांक ६ नुसार शासकीय कार्यालयात लावलेल्या पाट्या, फलक मराठीतून असावेत तसेच शासकीय कामकाजात पत्रव्यवहारांमध्ये, निमंत्रणपत्रिकेमध्ये व इतर बाबीसंदर्भात, रेल्वेस्थानके, गावाची नावे यांच्या नावाचा उल्लेख करताना मराठी भाषेत देवनागरी लिपीत नावे लिहावीत, अशा सूचना आहेत.
----------------------------