शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

जीपीएसची फेरनिविदा काढण्याचा निर्णय

By admin | Published: June 06, 2017 12:25 AM

मनपा स्थायी समिती सभेत निर्देश; दोन नागरी आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा जमा करणाऱ्या घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे पाच कंपन्यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. कंपन्यांनी सादर केलेले दर व तांत्रिक बाबींसंदर्भात आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधान करू शकले नसल्यामुळे जीपीएसची पुन्हा फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे निर्देश स्थायी समिती सभापती बाळ टाले यांनी प्रशासनाला दिले. नागरिकांच्या घरातून, बाजारपेठ व दुकानांमधून निघणारा केरकचरा जमा करण्यासाठी मनपाने पहिल्या टप्प्यात ८१ व दुसऱ्या टप्प्यात ४४ अशा एकूण १२५ नवीन वाहनांची खरेदी केली. नायगाव येथील डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याची साठवणूक अपेक्षित असताना काही वाहनचालक शहराच्या कानाकोपऱ्यात तसेच खुली जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा फेकून मोकळे होत असल्याचे चित्र आहे. वाहनचालकांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाने घंटागाड्यांवर ‘जीपीएस’ प्रणाली लावण्याचा निर्णय घेतला. निविदा प्रकाशित केली असता, मनपाकडे पाच कंपन्यांचे अर्ज प्राप्त झाले. यामध्ये सर्वात कमी दराची निविदा श्री इन्फोटेक बुलडाणा यांची होती. नगरसेवक अजय शर्मा, राजेश मिश्रा, सुनील क्षीरसागर, अ‍ॅड. इक्बाल सिद्दिकी, मोहम्मद मुस्तफा यांनी प्रशासनाला प्रश्न विचारले. उपायुक्त समाधान सोळंके यांनी नगरसेवकांचे समाधान क रण्याचा प्रयत्न केला. सभेला नगरसेविका सुमनताई गावंडे, योगिता पावसाळे, माधुरी बडोणे, सुजाता अहिर, पल्लवी मोरे, नगरसेवक हरीश आलिमचंदानी, फैय्याज खान आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.काय म्हणाले नगरसेवक ? प्रभागातील साफसफाईवर देखरेख ठेवण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य निरीक्षकांची नेमणूक केली आहे. तरीदेखील प्रभागात घाणीचे व कचऱ्याचे ढीग साचल्याचे मत नगरसेवक अजय शर्मा यांनी नोंदवले. वाहनाला किती लीटर इंधन लागते, हे तपासण्यासाठी जीपीएस प्रणाली कार्यान्वित करीत असाल तर त्यापूर्वी इंधनाची दैनंदिन डायरी तपासण्याची यंत्रणा सुरू करा, अन्यथा इंधनाची चोरी कोणतीही आधुनिक यंत्रणा रोखण्यास समर्थ नसल्याचे मत प्रभाग ८ चे नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी व्यक्त केले. शहरात घाणीची समस्या कायम आहे. त्यामुळे यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर लावण्यात आलेल्या जीपीएस प्रणालीचा नेमका निकाल काय, याची माहिती सभेत सादर करा. त्यानंतरच हा विषय मंजूर करण्याची मागणी सुमनताई गावंडे यांनी केली. जीपीएसमुळे घंटागाडी चालकांवर लक्ष राहत असेल तर ही प्रणाली कार्यान्वित करण्याची सूचना राजेश मिश्रा यांनी केली.मनपा कर्मचाऱ्यांकडे बनावट पावत्यादुकानदार, व्यावसायिकांकडे ‘डस्ट बीन’ नसल्याची सबब पुढे करून त्यांना दंड आकारणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांकडे बनावट पावत्या असल्याचे नगरसेवक अजय शर्मा यांनी सभागृहात सांगितले. बनावट पावत्या देऊन व्यावसायिकांजवळून पैसे उकळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी लावून धरली असता या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश सभापती बाळ टाले यांनी दिले. याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरी आरोग्य केंद्रांचा मार्ग मोकळाअकोट फैल परिसरातील मनपाच्या आयुर्वेदिक हॉस्पिटलचे नव्याने बांधकाम करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली. यासोबतच हरिहरपेठ परिसरात नागरी आरोग्य केंद्राची इमारत उभारण्याला सभापती बाळ टाले यांनी मंजुरी दिली. दोन्ही ठिकाणच्या इमारतींचे बांधकाम करण्यासाठी मनपाने निविदा प्रक्रिया राबवली असता सर्वात कमी दराची निविदा सिंग कन्स्ट्रक्शनची प्राप्त झाली होती.