अकोला: प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षी अकोला जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा काढलेल्या शेतकºयांच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाºया ५१ हजार ३२ शेतकºयांची संख्या कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पिकांचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट झाली आहे.प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी शासनामार्फत ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतीत (३१ जुलैपर्यंत) जिल्ह्यात १ लाख २४ हजार ५१२ शेतकºयांनी ९२ हजार १७३ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचा विमा काढला. पीक विमा योजनेंतर्गत २०१८ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७५ हजार ५४४ शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला होता. त्यापैकी केवळ ३४ हजार ८१४ शेतकºयांना १० कोटी ११ लाख रुपये पीक विम्याचा लाभ देण्यात आला. सर्वाधिक पीक विमा काढणाºया कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकºयांना मात्र पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. गतवर्षीच्या तुलनेत २०१९ यावर्षी पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख २४ हजार ५१२ शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला. त्यामुळे पीक विमा योजनेंतर्गत गतवर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात पीक विमा काढणाºया शेतकºयांची संख्या ५१ हजार ३२ इतकी कमी झाली आहे. त्यानुषंगाने पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट झाली आहे.दुष्काळी परिस्थितीत गतवर्षी पीक विमा काढल्यानंतर कापूस आणि सोयाबीन पीक विम्याचा लाभ शेतकºयांना मिळाला नाही. पीक विमा काढूनही लाभ मिळत नसल्याने, यंदा खरीप पिकांचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट झाली आहे.-शिवाजी भरणेशेतकरी, रामगाव, ता. अकोला.