आगर व हातला लोणाग्रा शेत शिवारातून चोंडा नाला गेलेला आहे या नाल्याला व्याळा पारस गायगावसह २० कि.मी. अंतरावरून पावसाळ्यात पाणी वाहत येते कंचनपूर आगर हातला लोणाग्रा परीसरात नाल्याचे पात्र कमी प्रमाणात प्रमाणात असल्याने पुराचे पाणी शेतातील पिकात शिरत असल्याने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होत असून शेतातील सुपीक जमीन खरडून जाण्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत दोन-तीन वर्षांअगोदर कंचनपूर शेत शिवारातून जलयुक्त शिवार योजनेंतर्गत चोंडा नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम जलसंधारण विभाग जिल्हापरिषद यांचेकडून हातात घेऊन आगर शिवारापर्यंत काम करण्यात आले पण निधीअभावी काम बंद पडले या दरम्यान चोंडा नाल्याला महापूर येऊन मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सहाय्यक अभियंता जल सिंचन विभाग जिल्हापरिषद यांना चार महिन्यापासून लेखी निवेदन देऊन चोंडा नाल्याचे खोलीकरण करण्याची मागणी केली आहे परंतु अद्यापपर्यंत कोणत्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नाही
काेट
चोंडा नाल्यातील खोलीकरण करण्यात यावे याबाबत शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले आहे. नाला खोलीकरण करण्याचे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ अधिकारी यांचेकडे पाठविण्यात आले. निधी उपलब्ध झाल्यास काम सुरू करू.
वाकपांजर
सहाय्यक अभियंता, जल सिंचन विभाग, जिल्हा परिषद अकोला