या उपक्रमामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार असून, नदीच्या पुरामुळे गावाला धोका होणार नाही, असे मत तलाठी गणेश डोंगरे यांनी व्यक्त केले. नागझरी नदीपात्रातील गाळ काढण्याच्या उद्घाटन कार्यक्रमात सरपंच मीराताई आनंद बोदडे, उपसरपंच महादेवराव नागे, ग्रामपंचायत सदस्या कमलताई घोडस्कार, जयश्रीताई घाटोळ, तलाठी हळदकर, सेवानिवृत्त पोलीस पाटील बळीराम वारुळकर, न. प. आभियंता भारत बोदडे, शामराव मोरे, अशोक पोहनकार, आनंद बोदडे, शरद बोदडे, कलदार पाटील, सोपान वारुळकर, विक्की कुलट आदी उपस्थित होते.
--------------------------
पाणीटंचाईची समस्या लक्षात घेता लोकसहभागातून नागझरी नदीचे खोलीकरण सुरू आहे. तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे गाळ काढण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
-मीराताई आनंद बोदडे,
सरपंच, ग्रा. पं. इसापूर.