शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
3
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
4
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
5
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
6
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
7
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
9
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
10
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

‘अमर रहे’च्या जयघोषात वीर जवानास निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 1:58 AM

अकोला : शहीद जवान सुमेध गवई यांच्यावर सोमवारी लोणाग्रा येथे शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातारवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे.. भारत माता की जय ..’च्या जयघोषात शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. तसेच अंत्यसंस्कारापूर्वी उगवा, नवथळ, आगर व लोणाग्रा येथे ग्रामस्थांनी साश्रुनयनांनी शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

ठळक मुद्देगावागावांत शहीद सुमेध गवई यांना श्रद्धांजली लोणाग्रा येथे उसळला जनसागर 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहीद जवान सुमेध गवई यांच्यावर सोमवारी लोणाग्रा येथे शासकीय इतमामात हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातारवरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘शहीद जवान अमर रहे.. भारत माता की जय ..’च्या जयघोषात शहीद जवानास मानवंदना देण्यात आली. तसेच अंत्यसंस्कारापूर्वी उगवा, नवथळ, आगर व लोणाग्रा येथे ग्रामस्थांनी साश्रुनयनांनी शहीद जवानास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. काश्मिरमधील शोपिया जिल्ह्यात दशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लोणाग्रा येथील जवान सुमेध गवई यांना वीर मरण आले. लष्करामार्फत त्यांचे पार्थिव सोमवारी अकोल्यात आणण्यात आले. शहरातील अशोक वाटिका येथे वीर जवान सुमेध गवई यांना श्रद्धांजली अर्पण करून, मानवंदना देण्यात आली. लोणाग्रा येथे अंत्यसंस्कारापूर्वी उगवा, नवथळ व आगर येथे ग्रामस्थांनी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत शहीद जवानास श्रद्धांजली अर्पण केली. विद्यार्थी, महिला -पुरुषांनी ‘शहीद जवान सुमेध गवई अमर रहे.. भारत माता की जय’चा जयघोष करीत वीर जवानास श्रद्धांजली अर्पण केली. तसेच गावागावांत रस्त्यांवर रांगोळ्या काढून शहीद जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सुमेध गवई यांचा जीवन परिचयसुमेध गवई यांचा जन्म १ ऑगस्ट १९९२ रोजी झाला. पहिली ते सातवीचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद शाळेत आणि ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण त्यांनी महात्मा गांधी विद्यालय, हातरुण येथे पूर्ण केले. बेताचीच परिस्थिती असल्याने शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही त्यांनी देशसेवा निवडली आणि दुसर्‍याच प्रयत्नात सागर येथे झालेल्या लष्कराच्या भरती प्रक्रियेत त्यांची २४ जुलै २0११ रोजी निवड झाली. त्यानंतर पंजाब, राजस्थान, पश्‍चिम बंगाल, आसाम, पाकिस्तान बॉर्डर आणि जम्मू काश्मीर येथे सेवा देत असतानाच १२ ऑगस्ट रोजी त्यांना वीरमरण आले.

यांनी वाहिली श्रद्धांजलीलोणाग्रा येथे वीरपुत्र सुमेध वामनराव गवई यांना आ. रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. बळीराम सिरस्कार, आ. गोपीकिशन बाजोरिया, ११ महार रेजिमेंटचे सुभेदार बसंतकुमार, नायब सुभेदार बाळासाहेब खराटे, .जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुरेश खंडारे, माजी सैनिक संघटना, माजी सैनिक महार रेजिमेंट संघटना एनसीसी ऑफीसर डॉ. आनंद काळे लोणाग्राचे सरपंच निर्मला सोनोने, माजी आ. डॉ. डी. एम. भांडे, माजी आ. हरिदास भदे, नारायणराव गव्हाणकर, श्रीकांत पिसे पाटील, बंडू ढोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, डॉ. एम. आर. इंगळे, जिल्हा परिषद सदस्य ज्योत्स्ना चोरे, प्रतिभा अवचार, गोपाल दातकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराड, राहुल धस, तहसीलदार राजेश्‍वर हांडे, वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील, पोलीस मुख्यालयाचे निरीक्षक विकास तिडके, उरळचे ठाणेदार सोमनाथ पवार, अकोट फैलचे तिरुपती राणे यांच्यासह सरपंच निर्मला सोनोने, पोलीस पाटील, अजय पाटील, अशोक शर्मा, माजी सैनिक संघटना, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुरेश खंडारे व इतर मान्यवरांनी वीरपुत्र सुमेध गवई यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

वीरपुत्राच्या निरोपासाठी जनसागर उसळला!वीरपुत्र सुमेध गवई यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी व त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोणाग्रा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह जिल्हाभरातून नागरिकांचा अलोट जनसागर लोणाग्रा गावात उसळला. एक हजार लोकवस्तीच्या गावात जिकडे-तिकडे केवळ शहीद जवानाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी दिसत होती. शहीद जवान सुमेध गवई अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. या गावात कधी नव्हे एवढी राजकीय मंडळी, प्रशासनातील अधिकारी व लोकांची गर्दी झाल्याने वीरपुत्र सुमेध गवई यांनी लोणाग्रा गावचे नाव अमर केल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या.

अन् त्यांनी फोडला हंबरडा!शहीद जवान सुमेध वामनराव गवई यांचे पार्थिव दुपारी १२ वाजताच्या सुमारास लोणाग्रा येथील त्यांच्या राहत्या घरात आणण्यात आले. त्यावेळी वडील वामनराव, आई मायावती, बहीण प्रीती आणि भाऊ शुभम यांच्यासह नातेवाईक व मित्रांनी एकच हंबरडा फोडला. सुमेध गेल्याचे दु:ख अनावर झालेल्या हजारो नागरिकांनी दाटून आलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

लोणाग्रा येथील शाळा प्रांगणात अंत्यदर्शनासाठी उसळली गर्दी!शहीद जवान सुमेध गवई यांचे पार्थिव लोणाग्रा येथे आणल्यानंतर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्रांगणात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. वीर जवान सुमेध गवई यांच्या अंत्यदर्शनासाठी  शाळेच्या प्रांगणात हजारो नागरिकांची गर्दी झाली होती. 

दु:खही अन् अभिमानही!सुमेध गवई यांना वीरमरण आल्याचा प्रचंड अभिमान कुटुंबीयांना होता. मात्र, तो आपल्यात नाही, याचे दु:खही त्यांना न पेलणारे होते. सुमेधसारखा वीरपुत्र भारत मातेसाठी शहीद झाला, असा पुत्र पोटी जन्माला येणे म्हणजे आयुष्याचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया कुटुंबीयांनी दिली. भावासाठी जीव की प्राण असलेला सुमेध नसल्याने शुभम हा एकाकी पडल्याचेही यावेळी दिसून आले.

शिस्तप्रिय, जीवलग सहकारी हरपला!शहीद सुमेध गवई यांना वीर मरण आल्याने, एक शिस्तप्रिय आणि जीवाला जीव लावणारा सहकारी जवान हरपला, अशा शब्दात शहीद सुमेध गवई यांचे मित्र आणि २२-महार रेजिमेंटचे जवान प्रशिक सदांशिव यांनी शोकसंवेदना व्यक्त केली. सैन्य दलात कर्तव्यावर असताना कोणत्याही कामात शहीद जवान सुमेध अग्रेसर राहत होते, असेही त्यांनी सांगितले.

निर्भय वृत्तीचे धनी होते शहीद ‘सुमेध’!सैन्य दलात कर्तव्य बजावताना वीर मरण आलेले सुमेध गवई कशाहीचीही भीती न बाळगता निर्भय वृत्तीचे धनी होते, अशी शोकसंवेदना  ११-महार रेजिमेंटचे सुभेदार बसंत कुमार यांनी सोमवारी लोणाग्रा येथे ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातल्या लोणाग्रा येथील जवान सुमेध गवई शहीद झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी लोणाग्रा येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर सुभेदार बसंत कुमार बोलत होते. सैन्य दलात कर्तव्य बजावताना कशाचीही भीती न बाळगता, कोणत्याही प्रसंगात धैर्याने तोंड देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून जवान सुमेध यांची ओळख होती. दहशतवाद्यांशी लढताना शहीद सुमेध गवई शहीद झाले. त्यामुळे प्रचंड धाडसी आणि मनमिळाऊ स्वभावाचा एक उत्तम सहकारी आमच्यातून हिरावल्याचे दु:ख आहे, असेही सुभेदार बसंत कुमार यांनी सांगितले.