- ह.भ.प.अशाेक महाराज जायले अध्यक्ष, भास्कर महाराज संस्थान ट्रस्ट अकाेली जहाॅंगिर
पंढरीचा वारकरी, वारी चुकू न दे हरी !
आषाढी आली म्हणजे पंढरपूरला जाण्याची आस निर्माण हाेते. वडिलांसाेबत इयत्ता चाैथीपासून पंढरीची न चुकता पायी वारी केली. काेराेनाच्या साथीमुळे मागील दाेन वर्षांपासून वारीचा खंड पडल्याने अंत:करणात प्रचंड वेदना हाेतात. त्या भावना शब्दात व्यक्त करता येत नाहीत.
- ह.भ.प. अरुण महाराज लांडे, पारस
४० वर्षांपासूनची वारी प्रथमच खंडित
वारकरी संप्रदायात पायी वारीला फार महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या पर्वावर विठ्ठलाचे सावळे रुप मनात भरुन घेण्यासाठी जीव अक्षरश: कासावीस हाेताे. वडिलांचे बाेट धरुन पंढरपूरची वारी सुरु केली हाेती. ४० वर्षांची ही परंपरा काेराेनामुळे खंडित करावी लागली आहे.
- ह.भ.प. संजय महाराज पाचपाेर, अडगाव (ता.पातूर)
विठ्ठलाच्या दर्शनासाठी मन व्याकूळ
आषाढी एकादशी जवळ आली की, वारकरी संप्रदायाला विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागते. पंढरपूरला जाऊन विठ्ठल,रुक्मिणीच्या दर्शनासाठी मन व्याकूळ झाले आहे. काेराेनामुळे ३२ वर्षांपासून जाेपासलेली वारी दाेनदा खंडित झाल्याने मनाला वेदना हाेतात. इथे पांडुरंग व गजानन महाराज यांचे अधिष्ठान मांडले असून पूजापाठ सुरु आहे.
- ह.भ.प. भास्कर महाराज काेळकट, वनदेवी आश्रम खरब खरबडी,मूर्तिजापूर