चतारी येथील शासकीय जागेतून २८ जानेवारी रोजीच्या पंचनाम्यामध्ये ७० ब्रास तसेच १९ फेब्रुवारी रोजीच्या पंचनाम्यामध्ये ५० ब्रास असे १२० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. मुरूम माफियांनी चतारी येथे शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे रात्रंदिवस मुरूमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. पातूरचे तहसीलदार दीपक बाजड यांनी वृत्ताची दखल घेऊन मंडळ अधिकारी व तलाठी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. २८ जानेवारी आणि १९ फेब्रुवारी असे दोन वेळा केलेल्या पंचनाम्यामध्ये १२० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आल्याचे अहवालात निष्पन्न झाले होते. सदर अहवालावरून तहसीलदार दीपक बाजड यांनी प्रत्येकी ट्रॅक्टर मालकाला एक लाख २९ हजार ६०० रुपये प्रमाणे पाच ट्रॅक्टर मालकावर साडेसहा लाख रुपयांची दंडात्मक कारवाई ९ मार्च रोजी केली होती. सदर दंड एका महिन्याच्या आत भरा, अन्यथा शासन थकबाकी म्हणून वसूल करण्याचे आदेशात नमूद होते. परंतु सदर दंडात्मक कारवाईला दोन महिन्याचा कालावधी उलटला मात्र दंडाची रक्कम वसूल करण्यास महसूल विभाग अपयशी ठरत आहे. सदर दंडाची रक्कम वसूल होईल किंवा नाही. याकडे चतारीसह परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
पास ट्रॅक्टर मालकांना साडेसहा लाखाची दंडात्मक कारवाई केली असून, दंड भरण्यासाठी एका महिन्याची मुदत दिली होती. त्यांना पुन्हा नोटीस बजावण्यात येईल दंड न भरल्यास सात बारावर बोझा चढविण्यात येईल. दीपक बाजड तहसीलदार पातूर बॉक्स वाळू व मुरूम माफियांना राजकीय पाठबळ चतारी परिसरातील शासकीय जागेतून शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आली असून, या परिसरात वाळू व मुरूम माफियाची टोळी राजकीय पाठबळ असल्याने सक्रिय आहे. त्यामुळे वाळू व मुरूम माफियांची मुजोरी वाढली आहे. बॉक्सपत्रकारावर हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.वाळू व मुरूम उत्खननबाबत वृत्त प्रकाशित केल्यावर वाळू माफियाकडून पत्रकारावर हल्ला करून त्याच्याविरुद्ध महिलेद्वारे खोटी तक्रार केली जाते,आणि सदर प्रकरण आपसात मिटविले जाते, पांडुरना येथील पत्रकार अमोल सोनोने यांच्यावर आलेगाव येथील वाळूमाफियांनी हल्ला केला होता. तसेच चतारी येथील मंगेश फाळके या पत्रकारावरसुद्धा शुक्रवार रोजी ७ ते ८ वाळू माफियांनी चाकू हल्ला केला तसेच या परिसरातील एका पत्रकारावर लोखंडी रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.