अकोला: दररोज कार्यालयात लेट येणाºया अकोला महापालिकेच्या १५ कर्मचाºयांवर एक दिवसाचे वेतन कपातीची कारवाई झाली आहे. महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये ही कारवाई झाल्याने इतर लेटलतिफ असलेल्या कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे.अकोला महापालिकेतील अनेक विभागातील कामकाज तेथील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या दिनचर्येप्रमाणे चालते. अनेक कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी सायंकाळी सहा-सात नंतर त्यांच्या कक्षात दिसतात. अनेक जण कार्यालयात कमी आणि मनपाजवळच्या चहाच्या ठेल्यांवर आणि इतर ठिकाणी बसून असतात. ही सवय बंद करण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी गत काही दिवसांपासून मनपाच्या कर्मचाºयांचा गाडा रुळावर लावण्यास सुरुवात केली आहे. सफाई कर्मचाºयांच्या कामांवर प्रत्यक्ष भेटी देणे, आरोग्य निरीक्षकांच्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेणे, असे काम सुरू केले. त्यामुळे मनपा कर्मचारी चांगलेच धास्तावले आहे. याचाच एक भाग म्हणून मनपा आयुक्त यांनी १५ कर्मचाºयांच्या एका दिवसाचा पगार कपात केला. ज्या कर्मचाºयांच्या गळ्यात ओळखपत्र टांगविलेले नव्हते त्यांच्यावर पाचशे रुपये दंडाची कारवाई केली. त्यामुळे आता इतर कर्मचारीदेखील हादरले आहेत. पाचशे रुपये दंडाच्या कारवाईचा फटका १४ कर्मचाºयांना सोसावा लागला, तर १५ कर्मचाºयांना एक दिवसाच्या वेतनास मुकावे लागले आहे. एकूण २९ कर्मचाºयांना हा फटका बसल्याने मनपा कार्यालयातील इतर कर्मचारी वेळीच सावध झाले आहेत. ही मोहीम सुरूच राहणार असल्याचा इशारादेखील मनपा आयुक्तांनी दिला आहे.