अकोला : शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे विविध योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. ही पदे भरण्याची मागणी होत आहे.-------------------------------------------
रस्त्यावर वाढली गर्दी
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात बुधवार सायंकाळी ९ पासून कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याने रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून आली. किराणासह अन्य सामानाच्या खरेदीसाठी सर्वांची लगबग सुरू होती.
-----------------------------------------------
रक्तदानासाठी समोर येण्याचे आवाहन
अकोला : लसीकरणामुळे रक्तदानाला अतिशय कमी प्रतिसाद मिळत आहे. लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येत नाही. रक्तदान करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
----------------------------------------------------
पुणे बस वेळेवर रद्द!
अकोला : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे-अकोला बस वेळेवर रद्द केली. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. प्रवासी नसल्याने बस वेळेवर रद्द झाल्याचे महामंडळाकडून कळले आहे.
-------------------------------------------------------
पाणंद रस्त्याची दुरवस्था
अकोला : जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद योजनेंतर्गत शेतरस्त्यांची कामे सुरू आहे; मात्र अद्यापही बहुतांश शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ते नाही. उर्वरित पाणंद रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या पाणंद रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
-------------------------------------------------------
भाजीपाला मातीमोल
अकोला : मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर संकटे येत आहे. बाजारात उठाव नसल्याने शेतकऱ्यांना भाजीपाला मातीमोल किमतीत विक्री करावा लागत आहे. खेड्यापाड्यांतील बाजारही बंद असल्याने अडचण वाढली आहे.