तो रुग्ण निगेटिव्ह
अकोट शहरात आढळलेला डेल्टाचा पॉझिटिव्ह रुग्ण हा सद्यस्थितीत ठणठणीत आहे.
आरोग्य विभागामार्फत त्यांची पुन्हा चाचणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रुग्णासोबतच त्यांच्या कुटुंबातील सदस्य व इतर लोकही निगेटिव्ह असल्याची माहिती आहे.
घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी आवश्यक
जिल्ह्यातील डेल्टाचा पॉझिटिव्ह रुग्ण सद्यस्थितीत निगेटिव्ह असून सर्वसामान्य जीवन जगत आहे. त्यामुळे अकोलेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.
सारीच्या रुग्णांचे घेणार स्वॅब
डेल्टाचा रुग्ण रहिवासी असलेल्या भागात आरोग्य विभागामार्फत विशेष सर्व्हेला सुरुवात करण्यात आल्याची माहिती आहे.
या अंतर्गत परिसरातील सर्दी, खोकला, तापाची लक्षणे असणाऱ्या सारीच्या रुग्णांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.
या रुग्णांचे कोविड चाचणीसाठी स्वॅब घेतले जाणार आहेत.
ही आहेत डेल्टा प्लसची लक्षणे
सामान्य लक्षणे
म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा.
घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार
तीव्र लक्षणे
छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे.
ही देखील आहेत लक्षणे
त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल
असा टाळता येईल धोका
घराबाहेर पडताना मास्कचा उपयोग करा.
आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा.
किमान २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा.
इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा, लोकांपासून ६ फूट अंतर ठेवा.
घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा आणि निर्जंतुकीकरण करा.
बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा आणि त्वरित स्पर्श करू नका.
डेल्टा पॉझिटिव्ह असलेला रुग्ण हा अकोट शहरातील रहिवासी आहे. त्या रुग्णासह त्याच्या कुटुंबीयांची तब्बेत ठणठणीत असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र, नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगण्याची गरज आहे. नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. सुरेश असोले, जिल्हा आरोग्य अधिकारी, अकोला