शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना दहा हजारांची ‘डिमांड’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 1:59 AM

अकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून यंदाच्या शालेय सत्रापासून मनपा शाळांमध्ये नर्सरी, केजी-१ आणि केजी-२ चे वर्ग सुरू केले. त्यासाठी मानधन तत्त्वावर शिक्षणसेविका, मदतनीस यांची निवड करण्यासाठी पदभरती प्रक्रिया राबवली. एकीकडे प्रशासन पारदश्री कारभाराचा असल्याचे सांगण्यात येत आहे पण  दुसरीकडे शिक्षण विभागाकडून सेविका आणि मदतनीस पदावर रूजू न झालेल्या रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांकडून दहा हजार रुपये उकळल्या जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. 

ठळक मुद्देशिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्हशिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवीखासगी कॉन्व्हेंटला परवानगी कशी?

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, या उद्देशातून यंदाच्या शालेय सत्रापासून मनपा शाळांमध्ये नर्सरी, केजी-१ आणि केजी-२ चे वर्ग सुरू केले. त्यासाठी मानधन तत्त्वावर शिक्षणसेविका, मदतनीस यांची निवड करण्यासाठी पदभरती प्रक्रिया राबवली. एकीकडे प्रशासन पारदश्री कारभाराचा असल्याचे सांगण्यात येत आहे पण  दुसरीकडे शिक्षण विभागाकडून सेविका आणि मदतनीस पदावर रूजू न झालेल्या रिक्त पदांसाठी प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांकडून दहा हजार रुपये उकळल्या जात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. महापालिकेच्या मराठी आणि हिंदी माध्यमातील शाळांमधून विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही परिस्थिती १५ वर्षांपूर्वी नव्हती. वर्तमान स्थिती लक्षात घेता शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे मनपा शाळांची ऐशीतैशी झाली. निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. इमारतींची दुरवस्था झाली असून, खेळाचे मैदान, स्वच्छतागृह, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, वर्ग खोल्यांमध्ये लाइट, पंख्यांचा अभाव आहे. यासर्व सुविधा पुरविण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेणे अपेक्षित होते. तसे न झाल्यामुळे शिक्षणाचा बट्टय़ाबोळ झाल्याची परिस्थिती आहे. या परिस्थतीवर मात करण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी मनपा शाळांमध्ये कॉन्व्हेंट उघडण्याचा निर्णय घेतला. यंदाच्या शालेय सत्रापासून नर्सरी, केजी-१, केजी-२ च्या वर्गांना मान्यता देण्यात आली. त्यासाठी रीतसर ३३ शिक्षणसेविका आणि मदतनीस यांची पदभरती प्रक्रिया राबवली. त्याकरिता मुलाखती घेण्यात आल्या. सेविका पदावर अद्यापही नऊ महिला उमेदवार रुजू झाल्या नाहीत, तर मदतनीस म्हणून सात पदे रिक्त आहेत. ज्या महिला उमेदवार रुजू झाल्या नाहीत, त्यांच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड होणार आहे. नेमकी हीच बाब हेरून शिक्षण विभागात कार्यरत काही कर्मचार्‍यांकडून प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्तीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवीमनपाच्या शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. आयुक्त अजय लहाने यांचा प्रशासकीय वतरुळात दरारा असतानासुद्धा या विभागातील कर्मचारी पैशांची मागणी करण्याचे धाडस करतातच कसे, असा सवाल उपस्थित होतो. एका कर्मचार्‍याला हाताशी धरून पडद्याआडून ही सूत्रे हलविणार्‍या अधिकार्‍याची पदावरून गच्छंती करण्याची वेळ आल्याचे बोलल्या जात आहे.

खासगी कॉन्व्हेंटला परवानगी कशी?मनपा शाळेच्या किमान २ किलोमीटर अंतराच्या परिसरात इतर कोणत्याही खासगी शाळांना परवानगी देता येत नाही. अनेक ठिकाणी मनपा शाळेलगतच खासगी कॉन्व्हेंटची उभारणी झाल्याचे दिसून येते. शिक्षण विभागातील खाबुगिरी करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांनी खासगी शाळांना परवानगी दिल्याचा परिणाम मनपाच्या शाळांवर होऊन विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत घसरण झाली.