परंतु त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुभाष पांडुरंग बोचरे यांनी पोलीस अधीक्षकांकडे २ मार्च रोजी पुन्हा तक्रार केली आहे.
तक्रारीत महात्मा फुले कला विज्ञान महाविद्यालयातील कर्मचारी, प्राध्यापक गैर कायदेशीररीत्या उपोषणाला बसले होते.
तसेच कार्यालयाच्या कामात अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर करीत होते.
यामुळे संस्थेने कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली होती.
ही नोटीस कर्मचारी यांनी वाचून घेण्यास नकार देऊन संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांच्यासोबत वाद घातला. त्या वादामुळे संस्थेच्या अध्यक्षांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दुरून बोला अशी विनंती केली. मात्र कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. असे संस्थेचे अध्यक्ष सुभाष बोचरे यांनी निवेदनात नमूद केले . त्याचबरोबर पातूर पोलिसांकडे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.