शासनाकडून मिळालेला हा निधी दलितवस्तीमध्ये खर्च करण्यात यावा म्हणून गावातील सत्ताधारी गटातील सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये शासनाची कुठल्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता न घेता सदर रोडच्या कामाला सुरुवात केली आहे.
कामाची ई-निविदा काढून काम सुरू करण्यात आल्यामुळे शासनाची सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी गटातील सदस्य दत्तात्रय वावरे यांनी केला आहे.
यासंदर्भात आपण गटविकास अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती दत्तात्रेय वावरे यांनी दिली. तूर्तास सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर प्रशासनाने कारवाई करावी व शासनाचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेले रोडचे काम थांबविण्यात यावे, अशी मागणी वावरे ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
वॉर्ड क्रमांक तीन व चारमध्ये अवैध वाळू साठा
महसूल विभागाची कुठलीही रॉयल्टी नसताना वाॅर्ड क्रमांक ३ व ४ मध्ये काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचे ढीग दिसून येत आहेत. या गंभीर बाबीकडे महसूल विभागाने लक्ष द्यावे अशी मागणीसुद्धा ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे.
आगर येथे सुरू असलेल्या दलितवस्ती सुधार योजनेच्या कामाची वर्क ऑर्डर मिळाली नाही. प्रशासनाची मान्यता नसताना, त्यांनर काम सुरू केले. कोणत्याही प्रकारचा ठराव झालेला नाही.
-बी. एस गावंडे, ग्रामविकास अधिकारी