येथील ग्रामपंचायतची पहिली सभा २६ फेब्रुवारीला घेण्यात आली होती. यामध्ये जमा खर्चाबाबत माहिती न देता, तो विषय प्रोसेडिंग बुकवर घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच विषय पुस्तकीवरील ६,७,८ हे विषय दलित वस्ती मधील पाणीपुरवठा वीज व्यवस्था, रस्ते, नाल्या यासंदर्भात विषय घेण्यात आले होते. या विषयांचे मासिक सभेत वाचन करण्यात आले नाही. ग्रामपंचायतची मासिक सभेची नोटीस ही सात दिवस अगोदर सदस्यांना मिळायला हवी होती. परंतु सभेची नोटीस तीन दिवसांपूर्वी २३ फेब्रुवारी रोजी देण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य शेख सलिम यांनी बेकायदेशीर कृत्याबद्दल विचारणा केली असता, त्यांना उद्धट वागणूक दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. अशा विविध विकासात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याचे काम सचिवाकडून होत आहेत. त्यामुळे संबंधित सचिव डिवरे यांच्यावर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शेख सलीम शेख रहुल्ला, मोहम्मद मुजाहिद, शेख मोईन शेख ख्वाजा, शीतल मानकर, बीशेख फिरोज, गजरावती इंगोले यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी बाळापूर यांच्याकडे तक्रारीत केली आहे.
ग्रामपंचायत सचिवावर कारवाई करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2021 4:19 AM