अकोला : महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास २४ खेड्यांचा नव्याने समावेश केला असून, या क्षेत्रात अद्यापही मुलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी युवा स्वाभिमान पार्टीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
युवा स्वाभिमान पार्टीने आयुक्तांना दिलेल्या निवेदनानुसार, महानगरपालिका हद्दवाढ होऊन पाच वर्षे पूर्ण होत आहे. तरी सुद्धा हद्दवाढ भागातील खेड्यांमध्ये मूलभूत सुविधा मिळालेल्या नसून, नागरिक सुविधांपासून वंचित आहेत. वॉर्डामध्ये घाणीचे साम्राज्य, जलवाहिनीचे काम अपूर्ण व नळाला पाणी न येणे आदी समस्या आहेत. महानगरपालिका भागात टॅक्स वसुलीसाठी टॅक्स पावती दिलेल्या आहेत ; मात्र सुविधा मिळत नाही. याकडे लक्ष देऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे. निवेदन देताना युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष सागर खंडारे, जिल्हा महासचिव आकाश जंजाळ, महानगराध्यक्ष सुमित पाखरे, जिल्हा उपाध्यक्ष साहिल खान, सुशील तेलगोटे, मंगेश इंगळे, अविनाश खंडारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (फोटो)