अकोला: पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपाइं (आठवले) अकोला शहर अध्यक्ष गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनात रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे विदर्भ अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष रोहित वानखडे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रिपाइंचे शहर उपाध्यक्ष राजकुमार सिरसाट, अनिल पहुरकर, रिपब्लिकन विद्यार्थी परिषदेचे वैभव वानखडे, सूरज वाडेकर, सिद्धू ओइंबे, विजय सावंत, मिलिंद लबडे, संतोष दाभाडे, शुभम वाघ, सनी मृदुंगे, उमेश इंगळे, साजन शेगोकार आदी उपस्थित होते.