कार्याध्यक्ष गजानन महाराज वानखडे यांच्या नेतृत्वामध्ये ३ मार्च रोजी पातूरचे नायब तहसीलदार अहेसानोद्दिन सय्यद यांना निवेदन देण्यात आले आहे. पातूर तालुक्यातसुद्धा वीज तोडण्याची कारवाई गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे. गोरगरिबांवर हा अन्याय होत असून, त्यांच्या घरामध्ये अंधार झाला आहे. कोरोनाचे संकट असतानाही अशी परिस्थितीत विद्युत वितरण कंपनी गोरगरीब जनतेचे विद्युत कनेक्शन तोडत आहे. महावितरण कंपनीने विद्युत बिल खूप मोठ्या प्रमाणात वाढ करून विद्युत बिले ग्राहकांना देण्यात आले आहेत व बिले न भरल्यास कनेक्शन कापले जात आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या घरामध्ये अंधार होत असून, त्यामुळे साप-विंचूपासून सर्वांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. गोरगरिबांना येत असलेली बिले विद्युत मीटरची रीडिंग न घेता देण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे विद्युत वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे तसेच गोरगरिबांना बिल भरणे सोयीचे जावे याकरता विद्युत बिलाचा भरणा कमी करून व त्यावरील व्याज कमी करून उर्वरित बिल टप्प्याटप्प्याने भरण्याची परवानगी देण्यात यावी व कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये, असे या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्ष ज्योती दाभाडे, रामदास मेटांगे, मनोहर कांबळे, गजानन गिऱ्हे, मोहम्मद आसिफ आदी उपस्थित होते.
कापलेले विद्युत कनेक्शन जोडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:34 AM