अकोला : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पुरवठा करण्यात येणारा धान्यसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना बाहेरून दुकानातून धान्याची खरेदी करावी लागत आहे. संचारबंदीमुळे काम बंद आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे धान्यसाठ्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आहे.
--------------------------------------------------------
मजूर गावाकडे परतले!
अकोला : रोजगाराअभावी ग्रामीण भागातील अनेक कामगार, मजूर कामाच्या शोधात शहरात गेले होते; मात्र आता कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे अनेक कामगार पुन्हा आपल्या गावाकडेच परतले आहेत.
-----------------------------------------------------
वीज यंत्रणेजवळ कचरा जाळणे धोक्याचे!
अकोला : वीज वाहिन्या, वितरण रोहित्र, फीडर पिलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामुळे वीज यंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीलाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने वीज यंत्रणेजवळ कचरा टाकू नये, तसेच जाळू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
-------------------------------------------------------
उन्हाच्या उकाड्यात वीज गायब
अकोला : शहरात मंगळवारी चांगलाच उकाडा जाणवत होता. त्यात वीज नसल्याने गर्मीने नागरिक त्रस्त झाले होते. शहरातील डाबकी रोड, बाळापूर नाका रोडवरील काही भागांत दोन-तीन तास वीज नसल्याने नागरिकांना उन्हाचा चांगलाच त्रास सहन करावा लागला.
----------------------------------------------------------