पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्रातील संत परंपरेचे एक आगळेवेगळे वैभव म्हणून श्री संत वासुदेव महाराज यांच्याकडे आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगतामधून सद्भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव देश-विदेशात होत आहे. इंग्लंड, अमेरिका, रशिया, नेपाळ आदी देशांमधून त्यांच्या ग्रंथ कर्तृत्वाचा गौरव झाला आहे. अशा महान विभूतींच्या कार्याचे चिरंतन स्मरण राहावे, यामुळे अकोला येथील शिवणी विमानतळाला श्री संत वासुदेव महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. याप्रसंगी श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था, श्री क्षेत्र श्रद्धासागरचे अध्यक्ष हभप वासुदेवराव महाराज महल्ले, विश्वस्त मंडळाचे सदाशिवराव पोटे, पुरुषोत्तम लाजुरकर, अविनाश गावंडे, मोहनराव जायले, महादेवराव ठाकरे, डॉ. अशोकराव बिहाडे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, व्यवस्थापक अमोल मानकर, पिंपरी चिंचवड येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे सरचिटणीस राम पाटील कुकडे आदी उपस्थित होते.
विमानतळाला संत वासुदेव महाराजांचे नाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:23 AM