अकोट : केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांच्या किमती वाढविल्याने शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे त्वरित खतांची दरवाढ मागे घेण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात धडक देत १७ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानुसार, कोरोनाच्या संकटकाळात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांसह शेतकरी त्रस्त झाले आहेत. असे असताना आता केंद्र सरकारने खतांची दरवाढ केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या निषेधार्थ निवेदन देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संग्राम गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास गोंडचर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या वेळी नानासाहेब हिंगणकर, नवनीत लखोटिया, शंकरराव चौधरी, राजीव बोचे, मतीन अहेमद, शारदा थोटे, प्रमोद लहाने, राम म्हैसने, अजमत खाॅ, नंदकिशोर भांबुरकर, कैलास थोटे, नागेश आग्रे, गोपाल पागृत, ऐजाज अहमद, उल्हास कुलट, इरफान पठाण, बंटी गावडे, ॲड. फैजान मिर्झा, बंडू कुलट, प्रदीप पायघन, अक्रम इनामदार, सौरभ मुरकुटे, यश कांबे, किशोर लोखंडे, श्रीकांत साबळे, राहुल हिंगणकर, संजय राऊत, रवींद्र मेतकर, अक्षय रावणकर, शुभम देशमुख, जयदीप चराटे आदी उपस्थित होते. (फोटो)