वाशिम, दि. 14 - विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील वाशिम वगळता पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांनी सोमवार ११ सप्टेंबरपासून सुरू असलेले हे आंदोलन गुरुवार १४ सप्टेंबर रोजी चौथ्या दिवशीही सुरू होते. या दिवशी अंगणवाडी सेविकांनी वाशिम जिल्हा परिषद कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करीत विविध प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील अंगणवाडी कर्मचा-यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला असून, यामध्ये वाशिम जिल्ह्यातील पाच तालुक्यातील अंगणवाडी कर्मचा-यांचा समावेश आहे. अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपामुळे अंगणवाडी केंद्रांतील बालकांना पोषण आहार वितरण बंद आहे. दिल्ली, केवळ, बेंगलोर, तामिळनाडू, पांडेचेरी राज्यांनी अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधन, वेतनात ब-यापैकी वाढ केली. महाराष्ट्र सरकारनेही सेविका, मदतनिसांच्या वेतनवाढीचा निर्णय घ्यावा, सेवानिवृत्तीनंतर लाभाची रक्कम २ लाख करावी, टी.एच.आर. बंद करावा, मिनी अंगणवाडी केंद्रे पुर्ण केंद्रात रुपांतरीत करावे, अंगणवाड्यांची स्टेशनरी, रजिस्टर, अहवाल व इतर साहित्य सरकारने पुरवावी, दरमहा १ तारखेपर्यत मानधन द्यावे, अंगणवाड्याचे खाजगीकरण करु नये, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. या संपाच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद कार्यालय परिसरात थाळीनाद आंदोलन करून त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले