अकोला : जवळच असलेल्या चांदूर शिवारातील रोहित्र गेल्या महिनाभरापासून नादुरुस्त आहे. शेतकऱ्यांनी हळद, कपाशी लागवड केली असून वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे हे रोहित्र दुरुस्त करण्याची मागणी कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनावर संजय माहोरे, दिनकर माहोरे, मारोती अढाऊ, नारायण टेकाडे, रंजित अंधारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.
व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब
अकोला : सध्या येथील बाजारपेठेतील व्यवहारातून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचे दिसत आहे. काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर अर्थव्यवस्थेला जबर फटका बसला होता. आजच्या घडीला व्यवहारामध्ये दाेन हजार रुपयांच्या नाेटा दिसून येत नाहीत.
‘पोलीस पाटलांना प्रोत्साहन भत्ता द्यावा!’
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात ग्राऊंड लेवलवर पोलीस पाटील व सरपंच हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कार्य करीत आहेत. संस्थात्मक विलगीकरणासह अन्य उपाययोजना केल्या जात असून, मानसिक धैर्य वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे त्यांना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
प्रमुख चौकांच्या सौंदर्यीकरणाची मागणी
अकोला : शहरातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण रखडले आहे. चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. यासह वाहतुकीचाही बिकट प्रश्न आहे. प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी आहे.
कार्यालयांमध्ये तक्रार पेट्यांची मागणी
अकोला : शासकीय-निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबद्दल अनेक तक्रारी असतात. तक्रारी निराकरण करण्यासाठी शासकीय कार्यालयात तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत.
ताडपत्री घेण्यासाठी गर्दी वाढली!
अकोला : सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक घरांची गळती रोखण्यासाठी ताडपत्री खरेदी करीत आहे. त्यामुळे दुकानांमध्ये सध्या गर्दी वाढली आहे.
बेरोजगारांसाठी शिबिरे घ्यावी!
अकोला : कोरोनामुळे अनेकजण बेरोजगार झाले आहेत. तसेच शासनाकडून कोणतीही शासकीय भरती प्रक्रीया राबविण्यात येत नसल्याने बेरोजगारांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बेरोजगरांसाठी रोजगाराभिमुख शिबिर राबवून मार्गदर्शन करावे, अशी मागणी बेरोजगारांकडून होत आहे.
शेतात काम करताना काळजी घ्यावी!
अकोला : खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामात व्यस्त आहेत; परंतु पावसाने शेतात दडलेले साप, विंचू व सरपटणारे प्राणी बाहेर पडत असतात. परिणामी, त्यांच्यापासून धोका होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतात काम करताना काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
बसची संख्या वाढली!
अकोला : जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्याने एसटी बसचीही संख्या वाढविण्यात आली आहे. बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. बसना ग्रामीण भागातही थांबे देण्यात आले.
८४ लाखांचे अनुदान बाकी!
अकोला : जिल्ह्यात कृषी विभागामार्फत फळपीक लागवड योजना राबविण्यात येते. या योजनेत २०२०-२१ मध्ये ७४ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. हा निधी अनुदान देय बाकी असलेल्या शेतकऱ्यांना देण्यात आला. तर ८४ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान अद्याप रखडले आहे.
शहरात पावसाच्या सरी कोसळल्या!
अकोला : मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने दिवसभर उकाडा जाणवत होता; परंतु सायंकाळी काही वेळ पावसाच्या सरी कोसळल्याने वातावरणात थंडावा जाणवू लागला असून अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.