- संतोष येलकर
अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दोन हप्त्यात मदत मंजूर केली असून, त्यापैकी मदतीच्या पहिल्या टप्प्यात मदत निधीही जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला; मात्र पहिल्या हप्त्यात मदतनिधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसऱ्या हप्त्यापोटी शासनाकडे मदत निधी मागणीची प्रक्रिया रेंगाळणार आहे.गत ३१ आॅक्टोबर २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील १५१ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यातील पीक नुकसान भरपाईपोटी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत वाटप करण्याकरिता २ हजार ९०९ कोटी ५१ लाख ९ हजार रुपयांचा मदत निधी दोन हप्त्यांत वितरित करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत २५ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आला. मंजूर करण्यात आलेल्या मदत निधीपैकी पहिल्या हप्त्याचा मदत निधी दहा दिवसांतील राज्यातील जिल्हास्तरावर वितरित करण्यात आला. उपलब्ध मदत निधी जिल्हाधिकारी कार्यालयांमार्फत दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला; मात्र प्राप्त मदतीची रक्कम दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने, दुष्काळग्रस्त शेतकºयांना दुष्काळी मदतीचा लाभ अद्याप मिळाला नाही. तसेच पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदतीची रक्कम शेतकºयांना वाटप करण्यात आल्यानंतर, दुसºया हप्त्याच्या मदत निधीची मागणी तातडीने करण्याचे निर्देश शासनामार्फत देण्यात आले आहेत; परंतु दुष्काळी मदतीच्या पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदत शेतकºयांना वाटप करण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसºया हप्त्याची रक्कम शासनाकडे मागणी करण्याची प्रक्रिया रेंगाळणार आहे.मदत निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होण्यावर प्रश्नचिन्ह!दुष्काळी मदतीचा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्यासाठी पहिल्या हप्त्याचा मदत निधी तातडीने दुष्काळग्रस्त शेतकºयांना वाटप करून दुसºया हप्त्यातील मदत निधीची मागणी तातडीने शासनाकडे करण्याचे निर्देश शासन निर्णयानुसार देण्यात आले आहेत; परंतु पहिल्या हप्त्यात उपलब्ध मदत शेतकºयांना वाटप करण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे दुष्काळी मदतीच्या दुसºया हप्त्याचा मदत निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.