तालुक्यातील तलाठी किशोर गायकी व सतीश दांडगे हे धोंडआखर येथे अवैध रेती वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांच्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. तलाठ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली; परंतु हिवरखेडचे ठाणेदार चव्हाण रेती माफियांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यांची तपासातील भूमिका संशयास्पद आहे. सदर प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा. विशेष सरकारी विधिज्ञांची नेमणूक करण्यात यावी. हिवरखेडचे ठाणेदार धीरज चव्हाण यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, यासह अनेक मागण्यांचे निवेदन एसडीओ यांना दिले. तलाठी संघटनेने कामबंद, धरणे आंदोलन आणि बेमुदत कामबंद इशारा निवेदनातून दिला. यावेळी अकोट उपविभाग संघटनेचे अध्यक्ष गणेश डोंगरे, सचिव अंकुश मानकर यांच्यासह तलाठी उपस्थित होते.
फोटो :