निवेदनात सीसीपीएस, एनपीएस योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित धोरणानुसार तात्काळ अनुदान मंजूर करा, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय सरसकट सर्वांना लागू करा , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १०,२०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंधाचा ११ डिसेंबर २०२० चा शासन निर्णय रद्द करावा, सातव्या वेतन आयोगाचा प्रलंबित पहिला व दुसरा हप्ता देण्यात यावा, राज्यातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला अदा करावे व नियमीत वेतन विलंबाने होण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अनुकंपा नेमणूक तात्काळ देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना विमाशि संघाचे अमरावती विभागीय कार्यवाह जयदीप सोनखासकर,अरविंद चौधरी अमरावती महानगर कार्यवाह, गजेन्द्र शेंडे सहकार्यवाह अमरावती ग्रामीण आदी उपस्थित होते.
फोटो: