चाेंढी ते पिंपळडाेळी रस्त्याची दुरवस्था
पातूर: तालुक्यातील चाेंढी ते पिंपळडाेळी रस्त्याची दुरवस्था झाली असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष हाेत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली परंतु अद्यापही रस्त्याची समस्या साेडवण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
-------------------
वातावरणातील बदलामुळे हरभरा, तूर पीक धाेक्यात
पातूर: वातावरणातील अचानक बदलासाेबतच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचे संकट आले आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तूर पीकही धाेक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
-----------------
जेसीआयतर्फे माेडक, लखाेटिया सन्मानित
अकाेट: जेसीआय अकाेटतर्फे अरविंद माेडक यांना गाेल्डन जेसी पुरस्कार तर आनंद लखाेटिया यांना स्टार जेसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेसीआय अकाेटच्या पदग्रहण साेहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा गाैरव करण्यात आला.
--------------
मच्छी मार्केट बंद करण्याची मागणी
आगर: वाॅर्ड क्र. दाेनमध्ये नवीन मच्छी मार्केट तयार करण्यात आले आहे. मात्र हे मार्केट जुन्या जागेतच सुरू ठेवावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे नवीन मार्केट बंद करण्याची मागणी हाेत आहे. याबाबत गजानन धारपवार यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे.