अकोला : जिल्हाभरातीलविविध शिक्षक संघटना संलग्नीत शिक्षण समन्वय समितीतर्फे १८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शिक्षण बचाव’ मोर्चा काढण्यात आला. तसेच आशा स्वयंसेविका व कृषी विद्यापीठ कर्मचाºयांनीही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यामुळे शनिवार आंदोलन वार ठरला.सर्व विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शिक्षणाचे बाजारीकरण रोखावे, शिक्षकांवर लादलेल्या आॅनलाइन कामासह अशैक्षणिक कामे काढून घ्यावीत, यासाठी विविध शिक्षक संघटना संलग्नित शिक्षण समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी स्वराज्य भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला.शासनाने २३ आॅक्टोबर २०१७ चा आदेश रद्द करावा, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व त्यानंतर सेवेत आलेल्यांनासुध्दा जूनी पेंशन योजना लागू करावी, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिकची यादी घोषीत करुन तुकड्यांसह त्यांना त्वरित बंद करावे, विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबवावी, शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी सर्व माध्यमांच्या शाळांना पायाभूत सुविधा घ्याव्यात, आॅनलाइन कामासाठी पदनिर्मिती करुन स्वतंत्र व्यवस्था करावी, स्वयंअर्थसहाय्यीत शाळा, महाविद्यालयांना मान्यता बंद करा, यासह विविध मागण्यांसाठी शिक्षण समन्वय समितीच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये शिक्षक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. मोर्चाचे नेतृत्व समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, सचिव डॉ. अविनाश बोेर्डे, उपाध्यक्ष प्रकाश तायडे यांच्यासह समन्वय समिती सदस्यांनी केले. याप्रसंगी संस्था संघटनेचे अध्यक्ष विजय कौसल, सचिव अॅड. विलास वखरे, जयदिप सोनखासकर, नरेंद्र गुल्हाणे, नरेंद्र लखाड, साबिर कलाम, प्रकाश डवले, प्रवीण ढोणे, प्रदीप थोरात, गजेंद्र काळे, बाळकृष्ण गावंडे, आशिष चवथे, मो.फारूक, मनिष गावंडे, रजनिश ठाकरे, संजय आगाशे, चंद्रशेखर म्हैसने, नितीन मुळतकर, गोकूल गावंडे, बळिराम झामरे, प्रेमकुमार सानप, गजानन चौधरी, एन.एस.तायडे, पद्मावती टिकार, दिलिप कडू, संदिप बाहेकर, रवी केतकर, राजेंद्र जलमकर, दिनकर गायकवाड, विलास खुमकर, राजेंद्र पातोंड, निरंजन बोचरे, शेख मुख्तारभाई, गणेश वानखडे, कल्पना धोत्रे, संतोष अहिर, डि.एस.राठोड, अशोक भराड, श्रीराम पालकर, संजय मईम, संजय देशमुख, प्रशांत डोईफोडे, विठ्ठल पवार, श्रीकृष्ण गावंडे, माया कोरपे, उज्वला हिवसे, मंजू घाटे, निलिमा घाटे, संगिता निचळे, छाया बिजवाडे, शेख हसन कमानवाले उपस्थित होते, असे विजय ठोकळ यांनी पत्रकात म्हटले आहे.
आशा स्वयंसेविकांना सुविधा द्या आशा स्वयंसेविकांना अंगणवाडी सेविकांप्रमाणे मानधन आणि इतर सुविधा देण्याच्या मागणीसाठी क्रांती आशा विकास फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. आशांना कामावर आधारित वेतनाऐवजी मासिक वेतन पद्धत लागून करावी, दरवर्षी दोन साड्या द्याव्या, बीपीएल कार्ड देऊन सवलत द्यावी, जिल्हा स्त्री रुग्णालयात विश्रामकक्ष द्यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्ण आणल्यास तातडीने प्रमाणपत्र द्यावे, विनामोबदला अतिरिक्त काम देऊ नये, दिल्यास त्याचा मोबदला द्यावा, राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत केलेल्या कामाचा मोबदला दरमहा द्यावा, गटप्रवर्तकांना अंगणवाडी पर्यवेक्षिकेप्रमाणे सुविधा द्याव्या, महापालिकेत गटप्रवर्तक पद मंजूर करावे, आशाच्या परिवाराला मोफत आरोग्य सेवा द्यावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर निवेदन जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.