अकोला : शहरातील उड्डाणपूल व रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करून, अकोला शहर धूळमुक्त करण्याची मागणी करीत फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
धूळ प्रदूषणामुळे शहरातील जनतेचे आरोग्य जपण्यासाठी शहरात सुरू असलेली उड्डाणपूल व रस्त्यांची कामे जलदगतीने पूर्ण करण्यात यावी, धूळ प्रदूषण आटाेक्यात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, खोदलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण केल्यानंतरच नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे, महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट भागातील रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी, धूळ व हवा प्रदूषणाचा स्तर जाहीर करावा आदी मागण्यांसाठी फुले-आंबेडकर विद्वत सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय आठवले, प्रा. सुरेश मोरे, डाॅ.बाळकृष्ण खंडारे, मंदा सिरसाट, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, गजानन गवई, डाॅ. संतोष पेठे, निरंजन वाकोडे, आनंद डोंगरे, मंदा वाकोडे, शैलेश इंगळे आदी उपस्थित होते.
.......................फोटो.................