शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 10:51 AM

संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.

अकोला: संसर्गजन्य कोरोना विषाणूची साथ, त्यात भरीसभर शहरात ठिकठिकाणी साचलेले पाणी व त्यात निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरल्याचे समोर आले आहे. शहरातील पानथळ भागात साचणाºया पाण्याची विल्हेवाट लावल्या जात नसल्याने आगामी दिवसांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे.मागील चार वर्षांपासून अकोलेकरांना डेंग्यूसदृश आजाराने हैराण करून सोडले आहे. पावसाळा सुरू होताच डेंग्यू, मलेरियाच्या आजारात वाढ होत असल्याचे दरवर्षीचे चित्र आहे. घरातील फ्रिज, कूलर, शोभिवंत फुलांची कुंडी, पाण्याची टाकी तसेच अनेक दिवसांपासून साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होते. एडिस एजिप्ताय या डासाने चावा घेतल्यास डेंग्यूचा फैलाव होतो. डेंग्यू किंवा मलेरिया झालेले अनेक रुग्ण शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल न होता खासगी रुग्णालयात दाखल होतात. शहरातील काही खासगी रुग्णालयांत डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. आगामी दिवसांत अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होणार असल्याची माहिती आहे. जीवघेण्या डेंग्यूचा धोका ओळखून महापालिकेच्या मलेरिया विभागासह वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने वेळीच उपाययोजना राबवणे अपेक्षित असताना संबंधित विभाग कमालीचे निष्क्रिय ठरत असल्याचे दिसून येत आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी प्रभागांमध्ये तसेच घरा-घरांमध्ये धुरळणी करणे व साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करून पाणी वाहते करण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभावी मोहीम राबवण्याची गरज असताना हिवताप विभागाने झोपेचे सोंग घेतल्याचे चित्र आहे.

रुग्ण डेंग्यूसदृश असला तरीही...डेंग्यूची लक्षणे आढळणाºया रुग्णांची दोन प्रकारे चाचणी केली जाते. ‘रॅपिड’चाचणीचे तीन प्रकार असून, तीनपैकी कोणतीही चाचणी ‘पॉझिटिव्ह’आल्यास तो रुग्ण डेंग्यूसदृश समजल्या जातो, तसेच ‘एलेन्झा’चाचणी केली असेल तर त्या रुग्णाला डेंग्यू झाल्याचे निश्चीत मानल्या जाते. ‘रॅपिड’चाचणीद्वारे डेंग्यूसदृश रुग्ण आढळला तरीही त्याच्यावर मात्र डेंग्यूच्या रुग्णाप्रमाणेच उपचार केले जातात, हे येथे उल्लेखनीय.

मनपाला माहिती देणे बंधनकारकखासगी रुग्णालयांमध्ये दाखल होणाºया डेंग्यूच्या रुग्णांची प्रशासनाकडे नोंद करणे बंधनकारक आहे. पालिकेच्या मलेरिया विभाग व आरोग्य विभागाने अद्यापही याबाबत जनजागृतीला सुरुवातच केली नसल्याचे दिसत आहे.

या मुद्यावर हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन वेळापत्रक तपासल्या जाईल. कामात कुचराई खपवून घेतली जाणार नाही. प्रभागात नियमित फवारणी होत नसेल तर नगरसेवकांनी सूचना द्यावी.-पुनम कळंबे, उपायुक्त मनपा.

प्रभागातील रस्तेच नव्हे तर सर्व्हिस लाईनमध्ये फॉगिंग केल्यास डासांपासून होणाऱ्या संभाव्य साथ रोगांना आळा घालता येईल. हिवताप विभाग कुचकामी ठरला असून, त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागत आहेत.-शीतल गायकवाड, गटनेता, राष्ट्रवादी

टॅग्स :Akolaअकोलाdengueडेंग्यू