अकोला : ढगाळ हवामान, तापमानातील बदलामुळे शहरात साथरोगांचा उद्रेक झाला असला, तरी विविध आजारांचे संभाव्य धोके ओळखण्यात कुचराई केल्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. डेंग्यूचे खापर महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेवर फोडल्या जात असतानाच खुद्द नगरसेवक, शासकीय अधिकारी, प्राध्यापक तसेच काही न्यायाधीशांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. डेंग्यूसदृश आजाराला आळा घालण्यासाठी जनजागृतीसोबतच स्वत: कृती करण्याची गरज निर्माण झाल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.दिवसभर कडाक्याचे तापणारे ऊन, त्यामुळे निर्माण होणारा उकाडा आणि सायंकाळ होताच थंड वातावरण अशा बदलामुळे शहरात ‘व्हायरल फिव्हर’ची साथ पसरली आहे. शहरात नित्यनेमाने साफसफाई केली जात असल्याचा दावा होत असला, तरी विविध भागात घाण व केरकचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. या सर्वांचा परिणाम अकोलेकरांच्या आरोग्यावर झाला असून, साथरोगांमुळे शहरातील खासगी रुग्णालये ‘हाउसफुल’ असल्याचे दिसत आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, घसा खवखवणे तसेच विषाणूजन्य रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यातही लहान मुले, वयोवृद्ध नागरिकांच्या आजारी पडण्याचे प्रमाण मोठे आहे. शहरातील खासगी रुग्णांलयांमध्ये डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण दाखल झाले आहेत. यातील डेंग्यूच्या रुग्णांचे रक्ताचे नमुने ‘पॉझिटिव्ह’ आढळल्याची माहिती आहे.घरामध्ये आढळल्या अळ्या!शहरात डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून येणाºया भागात मनपाच्या वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने परिसरासह घरांची तपासणी केली असता, नागरिकांच्या घरांमध्येच डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यामध्ये चक्क शासकीय अधिकारी, प्राध्यापक, न्यायाधीशांचे निवासस्थान तसेच मनपाचा कारभार हाकणाºया नगरसेवकांच्या घरांचा समावेश असल्याची माहिती आहे.प्रभाग नऊमध्ये ४४ घरांची तपासणीप्रभाग क्रमांक नऊमध्ये डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्यानंतर मनपा प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने गुरुवारी या भागातील नगरसेविका तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या शीतल गायकवाड यांच्या घरांसह स्थानिक रहिवाशांच्या घरांची तपासणी केली. सुमारे ४४ घरांच्या तपासणीत खुद्द नगरसेविकेच्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याची साठवणूक करणाºया मातीच्या रांजणाखाली ठेवलेल्या भांड्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या .यासह आणखी तीन घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. यावेळी संबंधितांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले.