शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; चंद्रशेखर बावनकुळेंविरोधातील उमेदवार ठरला
2
बाळासाहेब थोरातांच्या कन्येबद्दल वादग्रस्त वक्तव्य; सुजय विखे-पाटील यांना अटक करण्याची मागणी
3
सोलापूर जिल्ह्यात इच्छुकांचे टेन्शन वाढले: मविआसह महायुतीतही प्रचंड तिढा; कोणती जागा कोणाला सुटणार?
4
राज ठाकरेंनी आयात उमेदवार लादला; शिंदेंनी २०१९ ला तिसऱ्या क्रमांकाची मते घेणारा नेता फोडला
5
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
6
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
7
न्यूझीलंडनं ५७ धावांत गमावल्या ५ विकेट्स! टीम इंडियासमोर ३५९ धावांचे आव्हान
8
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
9
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
10
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
11
दिवाळीपूर्वी रमा एकादशी: व्रतपूजन कसे करावे? धन-वैभव-समृद्धी लाभ; पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
13
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
14
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
15
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
16
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
17
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
18
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
20
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-

कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:49 AM

आतापर्यंत १८   ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककार्ला (अकोला) : दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येत असलेल्या कार्ला बु. या गावात गत १० ते १२ दिवसांपासून डेंग्यू या आजाराने थैमान घातले असून, आतापर्यंत १८   ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. ते खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात स्वच्छता अभियानासह उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, दोघांना डेग्यू झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे, गावात भितीचे वातावरण आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य विभाग व्यस्त असतानाच कार्ला येथे डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले आहे. गावातील १८ जणांना आजाराची लागण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावात अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. कार्ला गावातील मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य आहे. दरम्यान, दोन ग्रामस्थांना डेंग्यू झाल्याचे निदान झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दानापूर प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एम. भीमकर यांनी गत १५ दिवसांत दोन वेळा गावात भेट देऊन तपासणी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनानेही याकडे लक्ष देऊन गावात स्वच्छता ठेवण्याची गरज आहे.

कार्ला गाव सौंदळा आरोग्य उपकेंद्रांतर्गत येते. सौंदळा आरोग्य उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने दानापूर प्रा. आ. केंद्रामार्फत आतापर्यंत चार वेळा भेट देऊन पाहणी केली व रक्त नमुनेसुद्धा घेतले आहेत.- डॉ. एस. एम. भीमकर, वैद्यकीय अधिकारी, दानापूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdengueडेंग्यूAkolaअकोला