अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवर येथील ढोणे कॉलनीमधील तडीपार करण्यात आलेल्या आरोपीस बेकायदेशीररीत्या शहरातच निवास करीत असताना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवर येथील ढोणे कॉलनीमधील रहिवासी सुबोध राजेंद्र ठोके (३५) याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे; मात्र तरीही तो बेकायदेशीररीत्या शहरात वास्तव्य करीत असल्याची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे यांना मिळाली. या माहितीवरून किशोर वानखेडे यांनी पथकासह छापा टाकून सुबोध ठोके यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, एमआयडीसी ठाणेदार किशोर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दयाराम राठोड, नीलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी केली.