शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

तुरीचे अनुदान ९९०० शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; १२ हजार शेतकरी प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 6:46 PM

जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांपैकी ९,९०० शेतकºयांच्या खात्यात शुक्रवारी तुरीचे अनुदान जमा करण्यात आले.

अकोला: ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदानाची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली असून, जिल्ह्यातील २२ हजार ३६८ शेतकºयांपैकी ९,९०० शेतकºयांच्या खात्यात शुक्रवारी तुरीचे अनुदान जमा करण्यात आले. उर्वरित १२,४६८ तूर उत्पादक शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.आधारभूत किंमत योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत तूर खरेदीत गत १५ मेपर्यंत जिल्ह्यातील अकोला, बाळापूर, पातूर, तेल्हारा, पारस, बार्शीटाकळी, अकोट व मूर्तिजापूर इत्यादी आठ केंद्रांवर तूर खरेदी करण्यात आली. नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आल्याने, तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी करूनही जिल्ह्यातील २२,३६८ शेतकºयांची तूर खरेदी करण्यात आली नाही. या पृष्ठभूमीवर तूर खरेदीसाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही, अशा तूर उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत गत जून महिन्यात प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात असतानाच, १५ दिवसांपूर्वी शासनामार्फत तूर अनुदानाची रक्कम मंजूर करण्यात आली. त्यानुसार अनुदानास पात्र जिल्ह्यातील २२,३६८ शेतकºयांपैकी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयामार्फत १३,९०० शेतकºयांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया ३० नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली. त्यामध्ये पहिल्या दिवशी (३० नोव्हेंबर) ९,९०० शेतकºयांच्या खात्यात तूर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली असून, उर्वरित ४,४९ शेतकºयांच्या खात्यात लवकरच अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तर विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अकोला शाखा अंतर्गत ८,४६८ शेतकºयांना अनुदान वाटप सुरू होण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यामुळे १२,४६८ तूर उत्पादक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे.८,४६८ शेतकºयांच्या याद्या ‘व्हीसीएम’कडे!आॅनलाइन नोंदणी केली; मात्र तूर खरेदी करण्यात आली नाही अशा अकोट व मूर्तिजापूर तालुक्यातील ८,४६८ शेतकºयांच्या याद्या विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या अकोला शाखेमार्फत विदर्भ को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मुख्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या. याद्यांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित शेतकºयांच्या खात्यात अनुदान जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी