---------------------------------------------------------
रस्त्यांवरील गर्दी कमी होईना!
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जिल्हा प्रशासनाकडून दिवसा व्यवसायास सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडण्याची आवश्यकता असताना अनेक जण अनावश्यक बाहेर फिरताना दिसत आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी काही कमी होण्याचे नाव घेत नाही.
---------------------------------------------------------
शासकीय कार्यालयात थर्मलस्कॅनिंग गरजेचे
अकोला : शहरासह ग्रामीण भागातून शहरातील शासकीय कार्यालयात येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यालयांमध्ये सॅनिटायझर मशीनसोबत थर्मलस्कॅनिंग गरजेचे बनले आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सर्व शासकीय कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची थर्मलस्कॅनिंग करणे आवश्यक आहे.
---------------------------------------------------------
सोयाबीनला सरासरी ६,२०० क्विंटल दर
अकोला : अतिवृष्टीमुळे खरिपात सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे. बाजार समितीत आवक कमी असल्याने सोयाबीनचे दर वाढत आहेत. गुरुवारी बाजार समितीत सोयाबीनला सरासरी ६ हजार २०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तर ९४० क्विंटल आवक झाली होती.