तालुक्यातील कान्हेरी सरप, सुकळी, पैसाळी, आळंदा, रुस्तमाबाद या गावांत शेती, घरे व गावकऱ्यांच्या भेटी वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि पंचायत समिती सभापती प्रकाश वाहुरवाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या.
यावेळी गटविकास अधिकारी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांच्याशी संपर्क करून पूरग्रस्तांना नुकसान भरपाईसाठी सर्व्हे करून पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य दादाराव पवार, माजी सभापती भारत निकोशे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन शिराळे, विजय तायडे, पुरुषोत्तम अहिर, विकास सदांशिव, डॉ. आखरे, शुद्धोदन इंगळे, भिकाजी अवचार, शंकर जाधव,नितेश थोप, ग्रामसेवक दिवनाले,अमोल सरप, श्रीकृष्ण देवकुणबी, हरीश रामचवरे, प्रशांत भातखडे, डिगांबर म्हैसने, राहुल मोहोड, ग्रामसेवक स्वाती उंबरकर, मोहन तायडे, वैभव वानखडे,तालुका पशुसंवर्धन अधिकारी गोळे, रोशन चोटमल, शुभम इंगळे आदी उपस्थित होते.