बँकेच्या संचालकपदासाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. महानंदाच्या निगडित सहकार क्षेत्राशी दिग्गज नेते वामनराव देशमुख व त्यांच्या पत्नी छाया देशमुख निवडणुकीत उतरल्याने चुरशीची लढत होणार आहे. पगारदार नोकरांच्या पतसंस्था व इतर सभासद मतदार संघातून वामनराव देशमुख, महिला मतदार संघातून छाया देशमुख, माळेगावच्या मंदा चौधरी, अकोला जिल्ह्यातील भारती गावंडे यांच्यात थेट लढत आहे. पगारदार मतदार संघातून वामनराव देशमुख व हिदायत पटेल यांच्यात लढत होत आहे. महिलांसाठी राखीव मतदार संघामधून विद्यमान संचालिका माळेगाव येथील मंदाबाई चौधरी पुन्हा एकवार निवडणूक रिंगणात उतरल्याने त्यांच्या विरोधात वाशीमच्या छायाताई देशमुख व अकोल्याच्या भारती गावंडे, अजून लढतीत असल्याने या मतदार संघात तिरंगी लढत आहे. बिगरशेती पतसंस्था मतदार संघामधून वाशीम जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच वामनराव देशमुख यांच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात उतरल्याने आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत रंगत आली आहे.
देशमुख दाम्पत्याच्या उमेदवारीने निवडणुकीत रंगत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 4:33 AM