अकोला: बाळापूर पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी पी.व्ही. दुधे यांची अकोला पंचायत समितीमध्ये बदली करण्यास महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनमधील महिला सदस्यांचा विरोध असल्याचे निवेदन निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले असतानाही त्यांच्या बदलीचा आदेश गुरुवारी देण्यात आल्याने महिलांमध्ये असंतोष उफाळला आहे.बाळापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले विस्तार अधिकारी पी.व्ही. दुधे यांच्यासह गटविकास अधिकारी शिंदे यांच्यावर महिलेने आरोप केले. त्यानुसार त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. दरम्यान, दुधे यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून ती सुरू करण्यात आली; मात्र त्यासाठी दुधे यांची बदली अकोला पंचायत समितीमध्ये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तांत्रिक कारणामुळे त्यांची अकोल्यात बदली होत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची अकोला पंचायत समितीमध्ये बदली करू नये, अशी मागणी महिला ग्रामसेवकांनी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष गणेश निमकर्डे, सचिव संजय गावंडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांना १७ डिसेंबर रोजी निवेदन दिले होेते. तरीही त्यांची बदली अकोला पंचायत समितीमध्येच केल्याचा आदेश पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी दिला आहे.