अकोला : जिल्ह्यातील अनेक महामार्गांलगत वीटभट्ट्यांचा गराडा असताना त्यापैकी केवळ ४६ ची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कोणतीच कारवाई न झाल्याने प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायद्याची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे चित्र आहे.कायद्याप्रमाणे राष्ट्रीय-राज्य महामार्गापासून दोनशे मीटर अंतरावर वीटभट्टीची जागा निश्चित झाली आहे, तर पारंपरिक वीटभट्ट्यांना मानवी वस्तीपासून कमीत कमी दोनशे मीटरच्या पुढे निर्मिती करता येईल, तसे कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे.पारंपरिक वीटभट्ट्यांच्या स्थापनेबाबतच्या नियमांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम १९८१ च्या कलम ५४ मध्ये सुधारणेची अधिसूचना सप्टेंबर २०१६ मध्ये प्रसिद्ध झाली. त्यावेळीच अंमलबजावणीचे निर्देशही देण्यात आले; मात्र त्यानंतरही हवेची गुणवत्ता बिघडविणाºया वीटभट्ट्यांसंदर्भात कोणतीही कारवाई अद्याप प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुरू केली नाही. त्यासाठी महसूल विभागाकडून माहिती मागविण्यात आली. माहिती मागवण्याच्या नादात अद्यापही वीटभट्ट्यांवर प्रदूषणासाठी कारवाईच झाली नसल्याची माहिती आहे.- महामार्गालगत वीटभट्ट्यांची गर्दीकायद्यानुसार वीटभट्ट्यांना आता प्रदूषण नियंत्रण मंडळाची संमती घ्यावी लागणार आहे; मात्र सद्यस्थितीत अकोला जिल्ह्यातील अनेक गावे, महामार्गालगतच वीटभट्ट्यांची प्रचंड गर्दी आहे. त्यामध्ये बाळापूर, चोहोट्टा, हाता, अंदुरा, भौरद, मनात्री या ठिकाणी महामार्गालगतच वीटभट्ट्या आहेत. त्यापैकी काहीच भट्ट्यांची माहिती महसूल विभागाकडे आहे. उर्वरित भट्ट्या अनधिकृत असल्याचेच चित्र आहे. त्यांच्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही, हे विशेष.- जिल्ह्यात कागदावर नोंद असलेल्या वीटभट्ट्यातालुका संख्याबाळापूर १०मूर्तिजापूर २३अकोट ९अकोला २बार्शीटाकळी १
वीटभट्ट्यांतून होणाºया प्रदूषणाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:47 PM