शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शाश्‍वत शेतीसाठी संशोधनाची दिशा निश्‍चित करणार - डॉ. विलास भाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 2:22 AM

अकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्‍वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्‍चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी केले.

ठळक मुद्देशास्त्रज्ञ, विद्यार्थ्यांनी योगदान देण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : प्रयोगशाळेतील संशोधन बांधावर नेण्यापेक्षा बदलत्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करू न वैदर्भीय शेती शाश्‍वत करण्यासाठी संशोधनाची नवी दिशा निश्‍चित केली जाईल. त्यासाठी शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांच्या योगदानाची गरज आवश्यक असल्याचे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी केले. भारतीय प्रजासत्ताकाच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठ मुख्यालयी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यासह बीजोत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यात विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली तथापि शेतकरी हित जोपासताना अधिक प्रयत्न आवश्यक असून, ग्रामीण भारत सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी आपले संशोधन व शेतीतील परिस्थिती यांचे सूक्ष्म आकलन करीत तंत्रज्ञान प्रसाराचे कार्य करावे लागणार असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमासाठी कीर्ती भाले यांच्या विशेष उपस्थितीसह विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संचालक संशोधन डॉ. विलास  खर्चे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, विद्यापीठ नियंत्रक विद्या पवार, विद्यापीठ अभियंता रामदास खोडकुंभे यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

उल्लेखनीय काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा गौरव  उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍यांचा यावेळी कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये राजेश गौड, विठ्ठल नीतनवरे, देवीदास हिवाळे, सुधाकर घाटे, भगवान फुलके, प्रभाकर पाठक, सचिन ईश्‍वरे, धम्मज्योत गणवीर, व्ही. व्ही. दाभाडे, विठोबा बढे, गणेश बेलसरे, बशीर खान पठाण यांचा समावेश होता. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांचासुद्धा गौरव करण्यात आला. 

खेळाडूंचा गौरव दोन दिवस घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट उपविजेता संघ नियंत्रक, अधिष्ठाता कार्यालय, विजेता संघ संचालक संशोधन (सीआरएस, सीडीएफ) बॅडमिंटन विजेता संघ पुरुष डॉ. मंगेश मोहरील व सचिन शिंदे, उपविजेता संघ डॉ. राहुल वडस्कर व डॉ. संदीप हाडोळे, बॅडमिंटन महिला विजेता संघ डॉ. सुचिता गुप्ता व डॉ. भाग्यश्री पाटील, उपविजेता संघ डॉ. मित्तल सुपे व डॉ. स्नेहलता देशमुख, टेबल टेनिस पुरुष विजेता जानुनकर व उपविजेता डॉ.ययाती तायडे, महिला संघ विजेता डॉ. मेघा डहाळे व  विद्या पवार  यांच्यासह क्रिकेटमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणारे डॉ. संदीप हाडोळे,  प्रेमदास लडके,  स्वप्निल जवंजाळ  यांचा कुलगुरू ंच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.यावेळी डॉ. हरमीतसिंग सेठी आणि चमूने श्रमदान, तर ५0 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी रक्तदान केले. त्यांचाही सन्मान करण्यात आला.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर