अकोला : जिल्ह्यातील प्रलंबित बॅरेजची कामे तत्काळ पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम देण्यासोबतच गावाशेजारच्या नद्या,ओढे ,नाल्यावर पूल वजा बंधारे बांधणे व पाणलोट क्षेत्र विकासाची गरज असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष वसंतराव धोत्रे यांनी केले.
अकोला जिल्हा जलसिंचन संघर्ष समितीची चिंतन बैठक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला येथे संपन्न झाली.या बैठकीचे समारोपप्रसंगी बोलत ते होते. बैठकीस अकोला जिल्हा जलसिंचन समितीचे सचिव भाई प्रदीप देशमुख,सदस्य बबनराव कानकिरड,वसंतराव केदार,किशोरकुमार मिश्रा, मनोहरराव ठोकळ,भीमराव इंगळे,गजानन पुंडकर, देवेंद्र देवर, ज्ञानेश्वर पाटील महल्ले यांचेसह बॅरेज क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील नेरधामना ,काटेपूर्णा नदीवरील घुंगुशी ,पारद व उमा नदीवरील रोहना प्रकल्पाचे प्रलंबित काम तत्काळ पूर्ण करणे , पिण्याच्या पाणी, गुराढोरांच्या व शेती सिंचनाच्या प्रश्नावर या बैठकीत मंथन झाले.