शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली विकसित, महाराष्ट्रात पहिल्यांदाच जिल्हा स्तरावर प्रणाली कार्यान्वित

By आशीष गावंडे | Published: January 18, 2023 7:01 PM

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते विनाविलंब अदा करण्यासाठी जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम ही प्रणाली अकोला जिल्हा कोषागारमध्ये सुरू करण्यात आल्याची माहिती आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच शासकीय योजनांच्या निधी वितरणाची कार्यवाही जलद गतीने करण्यासाठी राज्यात सर्वप्रथम जिल्हास्तरावर अकोला जिल्हा कोषागारमध्ये ई-कुबेर प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात रकमांचे तात्काळ थेट प्रदान करणे सोयीस्कर झाले आहे. धनादेश वटविण्याची प्रक्रिया तातडीने केली जाईल. देयके अदा करण्यातील विविध टप्पे कमी होतील. तसेच शासनाकडून प्राप्त विविध योजनांचा निधी संबंधित विभागाच्या बँक खात्यात दीर्घकाळ अखर्चित पडून राहणार नाही. शासन निधीच्या जमा व खर्चाची प्रक्रिया सुलभ होणार असल्यामुळे शासनाकडून नवीन निधी मिळण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडणार आहे.

राज्य शासनाचा 'आरबीआय' सोबत करारजिल्हा कोषागार मध्ये ई-कुबेर प्रणाली राबविण्यासाठी राज्य शासनाने भारतीय रिझर्व बँक सोबत करार केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही प्रणाली राबविण्यासाठी शासनाचा वित्त विभाग लेखा व कोषागरे संचालनालय, राष्ट्रीय सूचना केंद्र पुणे यांनी अकोला जिल्हा कोषागारची निवड केली आहे. राज्यात जिल्हास्तरावर सर्वप्रथम अकोला जिल्हा कोषागारमध्ये १२ जानेवारी पासून या प्रणालीच्या माध्यमातून शासकीय कार्यालयांची प्रदाने सुरू करण्यात आली आहेत.

अनेकदा शासनाकडून प्राप्त विकासकामांचा निधी संबंधित कार्यालयाच्या बँक खात्यात अखर्चित पडून राहतो. नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तातडीने अदा केली जातील. यामुळे शासकीय कार्यालयातील आर्थिक व्यवहार सुरळीत व जलद गतीने पार पडण्यास मदत होईल.- मनजीत गोरेगावकर जिल्हा कोषागार अधिकारी, अकोला